मर्डर वेपन - प्रकरण 12

  • 4.2k
  • 2.4k

मर्डर वेपन प्रकरण १२ “ मी आता अंगिरस खासनीस याला साक्षीसाठी बोलावतो.” प्रियमेध चंद्रचूड ने जाहीर केलं. “ गेली चार वर्षं तू रायबागी एन्टरप्रायझेस मधे मॅनेजर आहेस? ” –चंद्रचूड “ हो.” “ युअर ऑनर,हा आमच्या विरोधातला साक्षीदार आहे,म्हणजे आरोपीशी मैत्रीपूर्ण संबंध असलेला आहे.त्यामुळे याला थोडे आक्रमक आणि सूचक प्रश्न विचारावे लागतील.” चंद्रचूड न्यायाधीशांना म्हणाला. “ अत्ता तर तुम्ही त्याला एकच प्रश्न विचारलाय,त्यातून तो विरोध करणारा साक्षीदार आहे असं वाटत नाही.तुम्ही तुमच्या नेहेमीच्या पद्धतीने साक्ष घ्या.मला तसं काही वाटलं तर मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारायला परवानगी देईन.” “ ठीक आहे युअर ऑनर.” चंद्रचूड म्हणाला आणि नंतर खासनीस ला उद्देशून त्याने