मल्ल प्रेमयुद्ध आर्या घामाने डबडबली होती. क्रांती सुद्धा दमून बसली होती. सगळं चुकीच खेळले जातंय हे सगळ्यांना कळत होतं पण का? हे मात्र माहीत नव्हते.साठेसर सुद्धा आज वेगळ्याच प्रयत्नांमध्ये होते. वीर रत्नाला म्हणाला, "रत्ना मी साठे सरांना भेटून येतो, हे नक्की काय चालू हाय हे समजलं पाहिजे." रत्ना म्हणाली, " दादा मला एक कायतरी वेगळं प्रकरण वाटतय, आता ही मॅच होऊद्यात मग आपण मग बोलू साठे सरांबर..."" तोपर्यंत उशीर व्हईल..."" नाय व्हणार मला माहितीये... क्रांती अशी हार मानणारी पोरगी नाये तीसुद्धा नक्कीच काही ना काही तरी शक्कल लढवल." रत्नाने वीरला शांत केले.घाबरलेल्या क्रांतीकडे बघून वीरचा जीव तुटत होता. त्याला तिच्याजवळ