विद्यार्थी शिकवायचे की राखायचे?

  • 5.4k
  • 1.8k

विद्यार्थी शिकवायचे की राखायचे ; ऑनलाईन शिक्षणामूळं निर्माण झालेला पेच अलिकडील काळात हा ऑनलाईनचा काळ आहे. या काळात शाळेत शिकविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकाला दररोज अमूक काम करा अशा आशयाचे पत्र दररोजच प्राप्त होत असतात. ती कामं करावीच लागतात. नाही केली तर, वेतन थांबण्याची वा प्रलंबीत राहण्याची शक्यता असते. त्यातच अशी कामं करीत असतांना विद्यार्थ्यांना शिकवायचे केव्हा? असा प्रश्न पडणे साहजीकच आहे. तसं पाहता आजच्या या ऑनलाईनच्या काळात विद्यार्थी शिकवायचे की राखायचे? असा प्रश्न आजच्या शिक्षणकाळात प्रत्येकाला पडल्याशिवाय राहात नाही. हा विषय फार गंभीर असा विषय आहे. काही काही शाळेचं ठीक आहे. कारण त्या शाळेत बाबू आहे काम करण्यासाठी. त्या शाळेत