पॉवर ऑफ अटर्नी - भाग 13

  • 4.7k
  • 2.7k

पॉवर ऑफ अटर्नी भाग १३ भाग १२  वरुन पुढे  वाचा जेवण झाल्यावर माई किशोरला म्हणाल्या की विभावरीला तिच्या हॉस्टेल वर पोचवून ये. “पोचवून येऊ ? ते कशाला ? मला तर वाटलं की आज राहते आहे म्हणून. पण जायचंच असेल तर, ती जाईल की एकटी. नेहमीच तर जाते.” – किशोर “हो माई, जाईन मी एकटी, उगाच कोणाला त्रास नको.” विभावरीचा स्वर जरा चिडकाचं होता. “ओके, ओके येतो मी, कायमच राग कसा असतो ग तुझ्या नाकावर ? चल.” किशोर नी असं म्हंटल्यांवर विभावरीचा चेहरा फुलला. आणि मग दोघेही बाहेर पडले. हॉस्टेल वर पोचल्यावर, खाली थोडा वेळ गप्पा मारतांना विभावरी म्हणाली “किशोर,” “हूं”