पॉवर ऑफ अटर्नी - भाग 11

  • 5.2k
  • 3k

पॉवर ऑफ अटर्नी भाग  ११   भाग १०  वरुन पुढे  वाचा “पण तुमचं यात नुकसान आहे. पुढे मागे जर तुम्हाला फ्लॅट विकायचा असेल तर बँकेच्या फ्लॅट वर असलेल्या चार्ज मुळे  तो तुम्हाला विकता येणार नाही.” – सदस्य  “चालेल मला. तसंही मला तो विकायचा नाहीये.” विभावरीने मोहोर उठवली.  “तुमची तयारी असेल तर बँक lenient view घेऊ शकते. पण खात्रीपूर्वक असं काही आत्ताच सांगू शकत नाही. तो फ्लॅट तुमचाच आहे हे पण सिद्ध व्हायला पाहिजे.” सदस्य अजून ऐकायला तयार नव्हता. “अहो तो फ्लॅट जर किशोरचा नाही यावर विश्वास ठेऊन तुम्ही कारवाई करता आहात, तर तो माझा आहे हे पण अॅक्सेप्ट करायला पाहिजे