बाप.. - 1

  • 11.7k
  • 3
  • 5.9k

गरिबी तशी पाचवीलाच पुंजलेली.अशिक्षित जोडपं बाप दारूच्या गुत्त्यावर काम करायचा आई लोकांच्या शेतात मोलमजुरी करायची.मुलाच्या हव्यासापायी एक एक करत तीन मुली होऊन दिल्या अन चौथा मुलगा झाला.दारूच्या गुत्यावरच्या वादात कोयत्याने वार केले गेले बापावर गावगुंडांनी.पायावर झालेले वार पायाचा पंजा अर्धा तुटलेल्या अवस्थेत आई ने साडीच्या पदरात कसा तरी तो लपेटुन बापाच्या मित्राच्या रिक्षात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बापाला घेऊन आई पुण्यात रुबी हॉल ला गेली मुली घरी तशाच सोबत दोन वर्षांच्या मुलाला घेऊन आलेली.जोडीला पैसा नाही,नातेवाईकांनी तर सावलीला ही उभ केलं नाही.त्यात नवरा मरणाच्या वाटेवर,सोबत लेकरू,घरी लहान मुलं शेजारच्यांच्या भरोवश्यावर सोडून आलेली.दिड महिना यातच गेला कसा तरी बाप वाचला.पण गाव सोडावं