विद्यार्थी शिकत नाहीत, दोष कोणाचा?

  • 3.7k
  • 1.2k

विद्यार्थी शिकत नाहीत? दोष कोणाचा? शिक्षक हा शिकवायचे काम करीत असतो. तो शिकवतोच. कारण त्याचा त्याला मोबदला मिळत असतो. तो आपल्या शिकविण्यात तसूभरही कसर सोडत नाही. तो इमानदारीनंच शिकवतो. तरीही शासन म्हणतं की तो शिकवीत नाही. त्याचेवर ताशेरे ओढले जातात. त्याला डाग लावण्याचे प्रयत्न केले जातात नव्हे तर त्याला अपात्र ठरविण्याच्या गोष्टी केल्या जातात. शिक्षक शिकवीत असून व आपली सेवा इमानदारीनंच करीत असून त्याला काही लोकं काहीबाही बोलतात. त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढतात. त्याला वाईट लेखतात. त्याच्यावर कारवाई करु म्हणतात. परंतु असे बोलणे वा त्यांची धिंड काढणे बरोबर नाही. त्याला वाईट लेखणंही बरोबर नाही. कारण तो शिकवीत असलेले विद्यार्थी त्याचे काही