पुनर्वसन आधीच का नाही? पाऊस. पावसावर अनेक लोकांनी कथा लिहिल्या आहेत. काहींनी भरपूर कविताही. काहींच्या कादंब-याही आहेत तर काहींच्या कादंब-यात पावसाचे काही भाग. कारण पाऊस हा जिव्हाळ्याचा विषय आहे. तो जर नसेल तर मनुष्यजीवन व्यर्थ आहे. पाऊस येतो. उन्हाळ्यातील दाहकता घेवून जातो. उन्हाळ्यातील जी उष्मा अंगाची लाही लाही करीत असते. त्या लिहीला समाप्त करण्याची शक्ती या पावसाळ्यात आहे. खरं तर पावसाळा रम्य आहे. पाऊस भारतात साधारणतः जुन ते सप्टेंबर या काळात पडतो. समुद्रातील दोन प्रकारचे वारे असतात. पहिले म्हणजे खारे वारे व दुसरे मतलई वारे. समुद्रकिनारी वाहणारे हे दोन्ही वारे स्थानिक वारे असून समुद्राकडून जमिनीकडे वाहणार्या अशा वार्यांना खारे वारे