संविधान माहिती

  • 3.9k
  • 1.5k

स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमीत्याने सध्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव सुरु आहे. दररोज सरकारी कार्यालयात तिरंगा लहरत आहे. सरकारी कार्यालये सोडली तर मागील दोन दिवसापासून तिरंगा प्रत्येक व्यक्तीच्या घराघरावर लहरत आहे. एकंदरीत सांगायचं झाल्यास संपुर्ण वातावरण तिरंगामय झालेलं आहे. सुचना आहे, देश बदलत आहे. आपणही बदलायला हवं. संविधानात अनुच्छेद ५१ क मधील भाग ४ मध्ये नागरीकांची काही कर्तव्ये दिली आहेत. त्यात अनेक कर्तव्य आहेत. मोजकी घेतो. पहिल्या कर्तव्यात आपल्या राष्ट्रगीताचा, राष्ट्रध्वजाचा मान राखावा. संविधानाचाही मान राखावा असं लिहिलं आहे. परंतु खरं सांगायचं झाल्यास आपण खरंच संविधानाचा मान तरी राखतो काय? असा विचार केल्यास याचं उत्तर नक्कीच नाही असंच येतं. कारण जर आपण संविधानाचा मान राखला