मग कोणीही आत्महत्या करणार नाहीत? पाऊस.......पाऊस कधी येतो, कधी नाही. कधी जास्त येतो. कधी काहीच येत नाही. म्हणतात की पाऊस हा झाडांवर अवलंबून असतो. खरंच पाऊस हा झाडांवर अवलंबून तरी असतो का? तर याचं उत्तर होय असंही देता येईल. नाही असंही देता येणार नाही. होय असं द्यायचं झाल्यास सुर्याच्या उष्णतेपासून जी पाण्याची वाफ होते. ती पाण्याची वाफ वर आकाशात जाते. ती एवढी वर जाते की ती वर जावून थंड होते. ती थंड झालेली वाफ........त्या वाफेतून बाष्पाचे पुंजके तयार होतात. ते बाष्पयुक्त पुंजके वाहायला लागतात व जिथं डोंगरं असतात व जिथं झाडं असतात. तिथं ते अडतात व त्या ठिकाणी पाऊस पडतो.