ड्रेशकोड?

  • 3.6k
  • 1.4k

शाळेसाठी वेगवेगळा ड्रेशकोड, संस्कार रुजण्यास अडसर? अलिकडे शाळा बंदचा फतवा जाहीर केला व सर्वांना आश्चर्यात टाकत सरकारनं वीस किमीच्या अंतरावर एक शाळा अशी स्थिती निर्माण केली. त्यानुसार यानंतर गरीबांना शिकायला मिळेलच की नाही ही शंका उत्पन्न होते. आता तर देशात एवढ्या कॉन्व्हेंटच्या शाळा निघाल्या की सांगताच येत नाही. त्या आता बोटावर मोजण्याइतक्या राहिलेल्या नाहीत. गल्लोगल्ली कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत हे त्या त्या कॉन्व्हेंटच्या ड्रेशकोडवरुन लक्षात येतं. ड्रेशकोड.........ड्रेशकोड हा आधीपासूनच अस्तीत्वात आहे. ड्रेशकोड हे गुलामगीरीचं प्रतिक होतं. पुर्वी युद्ध होत. त्या युद्धात इतर टोळींना गुलाम केलं जाई. असे गुलाम ओळखू यावे यासाठी त्या गुलामांनी विशिष्ट असाच पोशाख घालावा ही संकल्पना रुजली व