आई महान

  • 3.9k
  • 1.4k

प्रत्येकाची आई महान, तेवढीच महत्वाची? आई म्हटलं तर आई या शब्दातच महान अर्थ दडलेला आहे. आ म्हणजे आधार देणारी व ई म्हणजे ईमानदारी शिकविणारी. आ चा अर्थ आधार देणे असा लावल्यास खरंच आई आधार देते का? असा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर होय असंच आहे. आई ही आपल्या बाळाला बापापेक्षा जास्त प्रमाणात आधार देत असते. ती सर्वप्रथम आपल्या बाळाला स्वगर्भात नऊ महिने ठेवते. अन्न पाणी पुरवते. त्याचं नवही महिने संरक्षण करते. त्याला त्रास होवू देत नाही. चांगलं संगोपन करते. त्यानंतर ते बाळ जेव्हा गर्भातून बाहेर पडतं. तेव्हा मात्र तिच आई उन्हातून सावलीत नेल्यागत त्याचं गर्भाबाहेरही संगोपन करते. अगदी त्याचा विवाह होईपर्यंत.