रुबाई, चारोळी, हायकू, संवादिनी म्हणजे काय हो? आधुनीक काळ फार व्यस्ततेचा काळ आहे. या काळात स्री आणि पुरुष दोघंही कामाला जात असतात. त्यामुळंच कोणाकडं वेळच उरलेला नाही. तसं पाहता त्याचं कारण म्हणजे महागाई. महागाईच्या या काळात सर्वांनाच आपलं पोट भरणं कठीण झालंय आणि त्या महागाईची झळ सर्वांनाच पोहोचलीय असे म्हणायला काहीच हरकत नाही. आज महागाई आहे व पोटासाठी पती पत्नी असलेले स्री पुरुष दोघही कामाला जातात. कारण महागाईमुळं व्यस्ततेची झळ त्यांना पोहोचलेली आहे. तशीच ती झळ कवी व लेखक वर्गालाही पोहोचलेली आहे. आता लोकं दिर्घ असलेली कादंबरी वाचत नाहीत वा एखादी दिर्घ कविता वाचत नाहीत तर ते लघु कविता किंवा