विटाळ अर्थात परीवर्तनाची शिल्पकार

  • 4.6k
  • 3
  • 1.7k

परीवर्तनाची शिल्पकार कादंबरीविषयी 'परीवर्तनाची शिल्पकार' ही माझी पंचावनवी कादंबरी असून साहित्य प्रकारातील ती त्र्यांशिवी पुस्तक आहे. या कादंबरीचे स्वरुप वेगळे असून अशा प्रकारची कादंबरी लिहिण्याचा विचार बऱ्याच दिवसांपासून मनात होता. परंतु ती बाब पुर्णत्वास येत नव्हती. या कादंबरीचा विषय विटाळ होता व तिचं शिर्षकही विटाळच होतं. परंतु मला माहीत झालं की तशाच शिर्षकाची एक कादंबरी जेष्ठ कादंबरीकार दया पवार यांची आहे. म्हणूनच मी ते शिर्षक बदलवलं व या कादंबरीचं शिर्षक परीवर्तनाची शिल्पकार ठेवलं. ही कादंबरी विटाळ व जातीभेदावर आधारीत आहे. यातील नायिकेवर डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव पडला व तिनं कसा आपल्या गावातील विटाळ दूर केला याचं वर्णन या कादंबरीत आहे.