मल्ल प्रेमयुद्ध - भाग 37

  • 4.7k
  • 2.9k

मल्ल प्रेमयुद्धगाडी थांबल्यावर स्वप्नाली आणि ऋषि थबकले. त्याची शेती बघून..."ताई हे बघितलंस का?" स्ट्रॉबेरीच्या रोपांना लालचुटुक स्ट्रॉबेरी बघून ऋषि खुश झाला."बापरे... किती मस्त! आणि हे कसं शक्य आहे. शेती एवढी स्वछ???" स्वप्नालीने एकवेळ सगळ्या शेतीवर नजर फिरवली."ऋषि पायीजे तेवढी स्ट्रॉबेरी खा... सिझनला मी स्ट्रॉबेरीच लावतो." भूषण म्हणाला."हे तू वीरदादाला का नाही सांगितलंस? ऊस लागवडीत काही अडचण नाही पण...." त्याचा शब्द मध्येच थांबवत भूषण म्हणाला."आर तुझ्या आबा मामांना पटायला पाहिजे ना... आधुनिक शेतीच किती खूळ वीर आणि संग्रामदादान त्यांच्या डोक्यात घालायचा प्रयत्न केला पण ते ऐकतील तवा न... ते जुन्या ईचाराच पोरांच्या मताला ते जुमानत न्हाईत. संग्रामदादा ऐकतो त्यांचं पण वीर