सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 9

  • 5.5k
  • 2.4k

साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे ९ जानकी तयारीला लागली होती.मध्ये अवघे सहा दिवस होते. चंद्रसेनाला सोडविण्यासाठी व्यवस्थित नियोजन करावं लागणार होते.जानकीने दयाळ व दादू कोळी यांना नक्र बेटावर बोलावले. सर्वानी एकत्र बसून खलबतं केली.जो दिवस चंद्रसेनाला बळी देण्यासाठी खड्गसिंगांने निवडला होता त्याच रात्री हल्ला करण्याचे निश्चित करण्यात आले.त्या दिवशी खड्गसिंगांची माणसे गाफिल असतील त्यामुळे काम थोडं सोपे होणार होते. " त्या रात्री सभोवतालच्या टेहाळणी बेटावरचे चाचे पण कर्ली द्विपावर जमा होणार आहेत. रात्री मोठी मेजवानी होणार आहे." शाम म्हणाला. " तूला कसं समजलं?" प्रतापरावांनी विचारले. " पिंगळ्याने त्यांचे संभाषण ऐकले होते." " हे खरं असेल तर काम आणखीच सोपं