यक्षिणी - भाग 3

  • 7.4k
  • 2
  • 4.2k

आता त्यांचं भेटणं रोजचं होऊन जाते. तिलाही मन मोकळे करण्यासाठी एक हक्काची जागा मिळते आणि तो रस्ताही तसा जास्त वर्दळीचा नसल्यानं काही गर्दुल्ले सोडले तर कोणी त्यांच्या गप्पामध्ये येत नव्हते. तिथले गर्दुल्लेही हळू हळू "अपने जैसी कोई पागल है "असा मनात विचार करून दुर्लक्ष करत.असेच दिवस चालले होते. मधेच एकदा भावाने येऊन थोडी आर्थिक मदत केलेली . त्यावर आणि नवऱ्याच्या पेन्शन वर घर कसेबसे तग धरून होते.पुन्हा आपला धंदा सुरू व्हावा म्हणून तीही तिच्या परीने धडपडत होती.आज ती नेहमीप्रमाणे ती धंद्याच्या ठिकाणी जाते तर तिथले दुकानदार पेढे हातात घेऊनच तिची वाट बघत असतात . "अहो ताई एक आनंदाची बातमी आहे