पॉवर ऑफ अटर्नी - भाग 7

  • 5.5k
  • 3.3k

पॉवर ऑफ अटर्नी भाग  ७ भाग ६   वरुन पुढे  वाचा रीजनल ऑफिस च्या समोर विभावरीला पाहून किशोर चकीतच झाला. म्हणाला “तुम्ही इथे काय करता आहात ?” “मी इथे काय करते आहेss, केवढा गहन प्रश्न विचारला तुम्ही. काय उत्तर देऊ मी तुम्हाला ?” -विभावरी. “सॉरी, पण.....” – किशोर. “ते मॅच मध्ये असतं ना, लोकं cheer up करतात. तसंच. तुमचं मनोधैर्य वाढवायला आले आहे. निर्धास्त पणे चौकशीला सामोरे जा. तुमची काहीच चूक नाहीये. त्यामुळे तुमच्या वर कसलाच ब्लॉट येणार नाही. काय ते खरं खरं सांगून टाका. मुळीच घाबरू नका. मी थांबते आहे इथे. चौकशी संपल्यावर आपण बरोबरच घरी जाऊ. ऑल द बेस्ट