यक्षिणी - भाग 2

  • 8.3k
  • 1
  • 5.3k

त्या वासाने मात्र हळू हळू तिच्या मनाचा ताबा घेतला. तिची अवस्था कस्तुरी मृगासारखी झाली.मन मोहित करणारा वास तर येतोय पण कुठून हे कळत नव्हते.तो वास तिला क्षणभर का होईना तिचं दुःख विसरायला लावतो.कशीतरी घरी पोहोचते. आजच्या प्रसंगाबद्दल घरी मात्र ती कोणालाच काही सांगत नाही . स्वतःच यावर काहीतरी उपाय शोधायचा असा मनोमन विचार करून झोपून जाते.आज घरी बसलो तर सासूबाईंना आणि मुलांना कळेल हा विचार करून ती घरी न बसता संध्याकाळी बाहेर पडते. आजूबाजूला असलेल्या ओळखीच्या दुकानदारांशी , तिथल्या भाजीवाल्या बायकांशी बोलून काय मार्ग निघतोय का याची चाचपणी करते.तिथल्या लोकांना तिची परिस्थिती माहीत असल्याने ते तिला धीर देतात. काहीजण तर