प्रकरण १८ न्यायाधीश नारवेकरआपल्या आसनावर बसले. “ दोन्ही बाजूचे वकील हजर आहेत? ” त्यांनी विचारले.“ पटवर्धनआज येणार नाहीत त्यांनी मला त्यांचे कामकाज पुढे चालवण्याची सूचना दिली आहे. ”सुकृतम्हणाला.“ मी आधीच एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, भरती ओहोटीच्या अधिकृत वेळापत्रकाचा विचार कोर्ट करेलच पण प्रत्येक ठिकाणी अगदी त्याचं वेळेनुसार भरती ओहोटी येत नाही, एखाद्या विशिष्ट जागी पाण्याची खोली किती आहे , खाडीचे मुख किती रुंद आहे इत्यादी बाबींचा परिणाम अचूक वेळ काढण्यासाठी विचारात घ्यावा लागतो.प्रजापतिची बोट ज्या विशिष्ट ठिकाणी नांगरली होती त्या ठिकाणी भरती-ओहोटी च्या वेळ आणि अधिकृत वेळापत्रका प्रमाणे असणारी वेळ यात किती तफावत आहे याचा पुरावा समोर आणणे सरकारी