यक्षिणी - भाग 1

  • 14.1k
  • 1
  • 7.2k

आज तिला वडापावची गाडी बंद करायला अंमळ उशीरच झाला ..घरी जाताना मनात विचारांचा कल्लोळ माजला.हल्ली रोज उशीर होतोय आपल्याला . काय करणार?, राहाटगाडं चालवायला रोजचा पुरेसा गल्ला तरी जमला पाहिजे ना?. कमावणारे आपण एकटे अन् खाणारी तोंड चार!. त्यात ही महागाई. महिन्याचे रेशनपाणी ,मुलांच्या शाळेची फी , सासूची औषधे.... आणि त्यात हप्ता घेणारे वेगळेच!!नवरा होता तेंव्हा अगदी राणीसारखं सुखात राहिलो आपण. श्रीमंती नव्हती पण कसली आबाळही नाही झाली. अचानक एक दिवस तिकडे काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवाद्यांच्या हल्ल्यात त्याला वीर मरण आलं काय आणि आपली ओढाताण सुरू झाली काय.. !!नाही म्हटले तर त्याची पेन्शन मिळते पण आजकाल महागाईच्या काळात कुठं पुरणार ती.?.घरात