मल्ल प्रेमयुद्ध हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसून क्रांती तयार झाली. पण तिच्या मनात भीती होती. नक्की येत्यात घरी पण कशासाठी?स्वप्ना काय म्हणलं? तिला उगच तरास सगळ्यामुळ... कधी सगळं नीट व्हणारे... चिनू आईला मदत करत होती. ऋषीचे सगळे लक्ष चिनुकडे होत. आत्या मामा दादासोबत बोलत बसले होते. स्वप्न क्रांतीबरोबर बोलायची संधीची वाट बघत होती."दादा अस व्हायला नको होतं. आम्ही समजावलं दाजींना." मामा म्हणाले."शेवटी लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असत्यात तिथं आपलं काय चालत व्हय... पण ह्या पोरांच्या मनात हाय म्हंटल्यावर म्या त्यांच्या माग खंबीरपण उभं राहणार हाय...आबा बापमाणुस हाय... त्यांना त्यांच्या लेकच्या मनातलं समजल, व्हय येळ लागल पण समजल... तोपर्यंत म्या हाय..."