गप्पा

  • 7.8k
  • 2.6k

गप्पा कोणालाही कोणत्याही वयात कोणत्याही विषयावर करायला आवडतात,सगळे परिचित एकत्र जमले की क्षणात गप्पा सुरु होतात. लहानपणी खेळाच्या मैदानात मारलेल्या गप्पा, बगिच्यात खेळताना मारलेल्या गप्पा, शाळेत मधल्या सुट्टीत मारलेल्या गप्पा,मोठं झाल्यावर ऑफ पिरेड मध्ये मारलेल्या गप्पा, सहलीतल्या गप्पा,मैत्रिणी कोणाकडे एकत्र जमल्यावर केलेल्या गप्पा,लग्नाकार्यात सगळे नातेवाईक जमल्यावर मारलेल्या गप्पा, ह्या सगळ्या प्रकारच्या गप्पा मनाला उत्साहित करतात. गप्पा म्हणजे मनावरचं फॉरम्याटिंग च आहे, जसं सिस्टिम किंवा मोबाईल झाला की आपण फॉर्म्याटिंग करतो आणि अनावश्यक डेटा पुसल्या जातो,सिस्टिम किंवा स्मार्टफोन परत पूर्वीसारखे वेगात काम करायला लागतात,तसेच जेव्हा आपलं मन जड होते तेव्हा मनसोक्त गप्पा मारून घेतल्या पाहिजे म्हणजे आपल्या मनाची सिस्टिम सुद्धा रिफ्रेश