सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 7

  • 5.4k
  • 2.1k

साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे ७ साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे ७ अघोरीची पूजा बंद होताच जानकी व इतर झटकन पुन्हा गुहेतल्या खोलीत उतरले. आत येताच जानकीने पहार खडकाच्या खाचीत घालून मागे ओढलं व पुन्हा जाग्यावर बसवलं.अचानक शाम खाली बसून ढसाढसा रडू लागला.जानकीलाही रडू येत होतं.तिने स्वतःला सावरले. " शाम,आपण बाबांना निश्चितच सोडवू, त्यासाठी व्यवस्थित नियोजन करावं लागेल. एक जरी चूक झाली तरी बाबांचा जीव धोक्यात येईल. आता हातपाय गाळून उपयोग नाही." जानकीने शामला समजावले. " जानकीताई, मला कसलातरी आवाज येतोय." चरण म्हणाला. "आवाज! मला तर काहीच ऐकू येत नाहीय." जानकी कानोसा घेत म्हणाली.चरणने खडकांच्या भिंतीला कान लावला.काहीवेळ