एक पडका वाडा - भाग 8 - (अंतिम )

  • 6.9k
  • 3.5k

त्या दागिन्यांचा उजेड सर्वत्र पसरला. सगळी अंधारलेली खोली प्रकाशाने लख्ख उजळली. "कालकेतू बाबा हे एवढे दागिने इथे कसे आले आणि ह्याचं आता काय करायचं?",माझ्या व रक्षाच्या बाबांनी त्यांना विचारलं काळकेतू बाबांनी ती संदुक पूर्ववत बंद केली आणि म्हणाले,"पोलिसांना ह्याची खबर द्यावी लागेल आणि सरकारी मालमत्तेत ह्याची भर पडेल." त्या खोलीतून बाहेर पडण्याचा आणखी कुठे मार्ग आहे का हे काळकेतू बाबा बघू लागले. त्या खोलीला एकही खिडकी नव्हती फक्त उंचावर छोटे छोटे झरोके होते. दुसरा कुठलाही मार्ग दिसत नव्हता. त्यामुळे आम्हा सगळ्यांना त्याच भुयारी मार्गाने जाणं क्रमप्राप्त होतं. खुंटीवर लटकलेल्या पिशवीत नाग एकसारखा वळवळत होता. काळकेतू बाबांनी तो नाग असलेली पिशवी