मनोगत शाळा बंद कादंबरीविषयी शाळा बंद ही कादंबरी वाचकांच्या हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. ही माझी त्रेपनवी कादंबरी असून ब्यांशिवी पुस्तक आहे. मला माझ्या पुस्तक लेखनात ई साहित्यानं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. शाळा बंदविषयी सांगतांना मी एवढीच गोष्ट सांगेन की सरकारनं सध्या वीस किमी अंतरावरील शाळा बंदचं पाऊल उचललं होतं. त्याचं कारण आहे पटसंख्या. सरकारचं म्हणणं होतं की परीसरातील पटसंख्या कमी झाल्यानं सरकारला शाळा पोषणं परवडत नाही. म्हणूनच सध्या वीस किमी अंतरावरील शाळा बंद करावी लागेल. हाच उद्देश घेवून मी शाळा बंद कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीत असा विषय मांडला आहे की आज वीस किमी अंतर परीसरातील शाळा बंद