मर्डर वेपन - प्रकरण 6

  • 6.7k
  • 3.4k

मर्डर वेपन प्रकरण ६ रती जाताच पाणिनीने कनक ओजस ला बोलावून घेतलं. “ कनक, तुला एक तातडीने काम करायचं आहे.माझ्या ड्रॉवर मधे मी रिव्हॉल्व्हर ठेवलं होतं. ते चोरीला गेलंय काल रात्री किंवा आज पहाटे किंवा सकाळी.” “ किती घाई आहे?” “ कनक, माझ्या अशीलाच्या ड्रॉवर मधून पळवलं गेलेलं रिव्हॉल्व्हर मला भलत्याच बाईने कदाचित चोराने इथे माझ्या ऑफिसात आणून ठेवलं, सर्वांच्या नकळत, आणि तेच माझ्या ताब्यातून चोरीला गेलंय.” “ आता हे ऐकल्यावर सरकारी वकील खांडेकर तुझ्यावर कुभांडच रचतील.” कनक म्हणाला. “ अगदी बरोबर.” “ कोणी चोरलं असेल काही अंदाज?” –कनक “ मला संशय तर माझ्याच अशिलावर आहे. रती रायबागी वर !