शिवाजीचे आधारस्तंभ मनोगतशिवरायांचे आधारस्तंभ नावाचे पुुस्तक वाचकांच्या हाती देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. ही माझी साहित्य विश्वातील एकोणसाठवी पुस्तक आहे. शिवरायांबद्दल सांगायचं झाल्यास शिवराय महान होवून गेले हे तेवढंच खरं आहे. तसंच त्यांना स्वराज्यही स्थापन करता आलं तेही खरं आहे. परंतू हे स्वराज्य काही त्यांना एकट्याच्या भरवशावर स्थापन करता आलेले नाही. त्यासाठी त्यांचे जे सवंगडी होते, सरदार होते, त्यांना हाताशी धरावं लागलं. त्यांनीही स्वामीनिष्ठा बाळगून व त्यांना धनी मानून त्यांच्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं. ते नसते तर शिवरायांना स्वराज्य स्थापनच करता आलं नसतं. हे करीत असतांना काहींनी आपल्या मुलांचे विवाहसोहळे मागे टाकले तर काहींनी आपला परीवार. यात तानाजीचा उल्लेख आवर्जून