साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे ६ पहाटेला जानकी व शाम किनार्यावरच्या वाळूत तलवारबाजी व तीरंदाजीचा सराव करत होती .चरण टाळ्या पिटत दोघांचा उत्साह वाढवत होता.तलवारींचा खणखणाट व लाटांचा धीर गंभीर आवाज वातावरणातील चैतन्य वाढवत होता. तलवारबाजी झाल्यावर तीरंदाजीचा सराव सुरू झाला. चरणनेने वाळूत एक खांब रोवला व त्यावर धातूचे गोल भांडे ठेवले .भांड्यावर चरणशने एक चेहरा काढला. " हा.. खड्गसिंग आहे. याच्या दोन डोळ्यांच्या मध्ये बाण लागला पाहिजे.चला..सुरु करा. जानकी ने धनुष्याला बाण चढवला व नेम धरत बाण सोडला खड्गसिंगा बद्दलचा राग तिच्या डोळ्यात उतरला होता बाण अचूक दोन डोळ्यांच्या मध्ये बसला होता.शाम व चरणने टाळ्या मारत जानकीचे कौतुक