मनोगत यात्रा नावाची ही पुस्तक कादंबरी स्वरुपात वाचकाच्या समोर ठेवतांंना मला अत्यंत आनंद होत आहे. ही पुस्तक म्हणजे एक प्रवासवर्णन असून ते पुस्तक मी कादंबरीच्या स्वरुपात मांडलेले आहे. यातील कथानक थोडक्यात असं. एक आनंद नावाचा व्यक्ती. तो दरवर्षी नागद्वारची यात्रा काढत असतो. बिचा-याच्या स्वार्थ नसतो त्यात. त्यातच या यात्रेत काय काय अनुभव येतात. त्याचं वर्णन या पुस्तकात आहे. आपण ती पुस्तक वाचावी व नागद्वारचं दर्शन घ्यावं वास्तविक नाही तर पुस्तक रुपानं एवढंच आपणास सांगणं आहे. यामध्ये नागद्वारमधील बहूतेक सर्व गुफांचं वर्णन आहे. त्या पहाड्या बोलत असलेल्या भाषतात तसेच नद्याही. नागद्वारमध्ये अतिशय रमणीय असं वातावरण असून त्याचं वर्णनही त्यात आहे. आपण