ते दहा ही सांगाडे आज्ञा मिळल्याप्रमाणे त्या राखेच्या वर्तुळाभोवती बसले. "ती दुसरी मुलगी कुठे आहे?",मांत्रिक बाबांनी मला पुन्हा विचारलं. "त्यासाठी आपल्याला त्या कपाटात जावं लागेल.",मी म्हंटल मी माझे बाबा रक्षाचे बाबा आणि मांत्रिक बाबा त्या कपाटात कसेबसे उभे राहिलो आणि मी कपाटाच्या भिंतींवर मागच्या बाजूने जोर देताच गुप्त मार्ग खुला झाला आणि आम्ही बोगद्यात घसरलो आणि घसरत घसरत त्या तळघरात पोचलो. तिथल्या सापांना चुकवत चुकवत आम्ही त्या फरशी वर उभे राहिलो आणि लगेच फरशी बाजूला होऊन तिथला गुप्तमार्ग खुला झाला. त्या बोगद्यातून चढत चढत आम्ही त्या दोन लोखंडी कड्यां पर्यंत आलो. "त्या उजव्या कडीला चुकूनही हात लावू नका",मी जोरात ओरडली.