एक पडका वाडा - भाग 1

  • 14.5k
  • 8.2k

"चल ह्यावेळेस नीट नेम धरून मार बरं! आपल्याला हरायचं नाही ह्यावेळेस!",माझी मैत्रीण सीमा मला म्हणाली. मी बरोब्बर नेम धरून एकावर एक रचून ठेवलेल्या लगोऱ्यांवर एक दगड मारला आणि नेम अचूक लागला. आम्ही जिंकलो. "चला यार आता काही तरी वेगळं खेळू. ही बघ मी गिल्ली आणली आहे तुझ्या जवळ दांडू आहे न?",रक्षाने साक्षीला विचारलं. "हो हा काय! मी घरून लक्षात ठेवून आणला",साक्षी जवळचा दांडू दाखवत म्हणाली. "आण तो दांडू,आमची टीम जिंकलीय न मग आधी मीच खेळणार!",मी "घे बाई! तू खेळ आधी",असं म्हणून रक्षाने मला गिल्ली दांडू दिलं. "हे बघ असा स्ट्रोक मारायचा! हां! की गिल्ली अशी दूर.... जाऊन...... पडते",असं म्हणत मी