मल्ल प्रेमयुध्द"काय खरं सांगतोयस?" संग्राम जवळ जवळ किंचाळला."व्हय दादा लंग्न करिन... नक्की करिन पण फकस्त क्रांतीबर" वीर म्हंटल्यावर संग्रामच्या चेहऱ्यावर आनंद पण बाकी सगळे बसलेले उठून उभे राहिले. "वीर... खेळ न्हाय हा..." सुलोचनाबाई म्हणाल्या."खेळ तुम्ही लावलाय म्या न्हाय... तुम्ही म्हणता म्हणून म्या लग्न करायच तुम्ही म्हणाला कि माझं ठरलेलं लगीन मोडायचं... आबा माझं मन हाय का न्हाय? मला इचारात घ्यायला पाहिजे व्हतं तुमी... आत्या तुला ठाव हाय माझं किती प्रेम हाय क्रांतीवर तुम्ही तरी आबा अन आईला समजवायचं..."वीर बोलून गेला."म्हंजी गावातला प्रत्येक माणूस माझा शबूद मानतो ते येडे हायत अन तुमी एकटेच शाहने..." आबा रागाने बोलले."न्हाय आबा आज तुमचा हा