सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 5

  • 5.6k
  • 2.4k

साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे ५ दुसर्या दिवशी पहाटेच जानकीने शामला झोपेतून उठवले. अभयची निघण्याची तयारी झाली का ते पहायला तिने शामला पाठवले.ती स्वतः तयार झाली होती. कासोटा घातलेले मोरपंखी रंगाच लुगड वर लाल रंगाचा पोलका.. बाजूबंद...निळ्या रंगाच्या बांगड्या..चंद्रकोरीच्या आकाराचे ठसठशीत कुंकू..पायात चामड्याच्या चपला...चामड्याच्या कमरपट्टा त्यात तलवार लटकत असलेली असा पेहराव तिने केला होता. ती बाहेर चांद घोड्यावर मांड ठोकून तयार होती.एवड्यात अभय व शाम तिथे आले. येताना अभय प्रतापरावांना भेटून आला होता.मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईन असं वचन त्याने प्रतापरावांना दिले होते. जानकीला पाहताच तो स्तब्ध झाला.ते घरंदाज आरसपानी सौंदर्य बघून तो भारावला होता. दुसर्या घोड्यावर शाम व