पॉवर ऑफ अटर्नी - भाग 5

  • 6.3k
  • 4k

पॉवर ऑफ अटर्नी   भाग  ५ भाग ४  वरुन पुढे  वाचा किशोर घरी गेल्यावर चहा पिता पिता आईशी बोलत होता. रोज दिवसभराचं अपडेट देण्याची त्याची सवय होती. विभावरीनी सांगीतलेली  सानिकांची कथा सांगून झाली. हे सगळं पुराण ऐकल्यावर आई खूपच हळहळली. म्हणाली “एवढं सगळं तिने सानिकासाठी केलं म्हणजे एक प्रकारे धाकट्या बहि‍णीसारखी सांभाळतच होती तिला. पण तिने अशी परतफेड का केली असावी हे काही समजत नाही. कृतघ्न पणाचा कळसच गाठला. काय म्हणावं या पोरीला ? विभावरीला केवढा धक्का बसला असेल यांची कल्पनाच करवत नाही. बिचारी विभावरी!” आईने संवेदना प्रकट केली.  “धक्का बसला आहेच. पण आता सावरली आहे. म्हणत होती की, आपण सगळे