पॉवर ऑफ अटर्नी - भाग 4

  • 6.4k
  • 4.1k

पॉवर ऑफ अटर्नी  भाग  ४ भाग ३ वरुन पुढे  वाचा “विभावरी मॅडम लोकं आपल्याकडे बघताहेत, स्वत:ला सावरा.” विभावरीनी त्याच्याकडे पाहीलं. डोळे पाणावलेले आणि नाकाचा शेंडा लाल लाल झाला होता. तिने पर्स मधून रूमाल काढला आणि चेहरा पुसला. किशोर कडे बघून हसली. म्हणाली “किशोर सर, तुम्ही नका काळजी करू तुम्ही काहीच गुन्हा केला नाहीये, उलट तुम्हीच फसवल्या गेले आहात. देव इतका निष्ठुर नाहीये. सगळं काही ठीक होईल. मला विश्वास आहे.” किशोर हसला. म्हणाला “जेंव्हा कोणी तुमच्याबद्दल आपलेपणाने बोलतो तेंव्हा इतकं बरं वाटतं. विभावरी मॅडम थॅंक यू.” “किशोर सर, मला जे जाणवलं तेच मी बोलले. माझं तर फक्त आर्थिक नुकसान झालेलं आहे