मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 13

  • 4.2k
  • 2.4k

10 x 10 ची लाल रंगाची खोली दिसत होती . खाली फरशी नसून शेणाने सारवलेली तुलतूलित भुई होती. खोलीत चारही बाजुंना असलेल्या लाल रंगाच्या दहा फुट उंचीच्या भिंतींवर काळ्या कोळश्याने पौराणिक मंत्र रेखाटळेले , तर कुठे अभद्र सैतानी हिडिस आकाराचे चेहरे कोरले होते. जसे की टक्कल पडलेल डोक, त्या टक्कल पडलेल्या डोक्यातून दोन शिंग उगवलेली, बैलासारख तोंड असलेला माणुस - बाकी शरीर मानवाच होत. त्याच्या हातात एक कू-हाड दिसत होती. अळ्या, झुरळ , नाना त-हेच्या कृमी युक्त कीटकांची नासकी शरीर असलेल्या सैतानांची छ्वी तिथे भयंकर रित्या काळ्या कोळश्याने कोरलेली होती.. कोणी मानवाच अवयव फाडुन खात होत.....तर कोणी रक्ताने माखलेल तोंड