थरथराट कालोख्या रात्रीचा नोट - ह्दयाचा त्रास असणा-यांनी ह्या पुढचे भाग बिल्कुलंच वाचू नका ! पंतांचा वाडा हॉलमध्ये ड़ायनिंग टेबल बाजुलाच थोड दूर चार सोफे होते. मधोमध एक मोठा काचेचा टिपॉय होता. एका सोफ्यावर ललिताआज्जी तिच्या बाजुलाच आनिशा, तिच्या बाजुलाच रिया बसली होती. दुस-या डाव्या बाजूच्या सोफ्यावर रघुराव त्यांची पत्नी निषा, दोघेच बसले होते. आणि ह्या सर्वाँसमोर पुढच्या सोफ्यावर एकटा आर्यंश बसला होता . दोन्ही पाय एकमेकांना जोडून, आणी दोन्ही हात मांडीवर ठेवून , खाली मान घालून तो बसला होता. ह्या सर्वाँत जखोबाचा मात्र पत्ता नव्हता! न जाणे तो कोठे असावा? ही सर्व मंडळी जिथे बसली होती -त्या सर्वाँच्या मागेच