ep - 2 ) रातकीड्यांची किरकीर्र मंद गतीने ऐकू येत होती. एक पिवळ्या रंगाचा पेटलेला बल्ब दिसत होता. त्या पेटलेल्या बल्बच्या अवतीभोवती एक दोन उडणारे किडे गोल गोल फे-या मारत होते ! त्याच बल्बच्या उजेडा जवळून वाकडीतिकडी वाफ उडत गेली. बाजुलाच एक चौकोनी स्टो पेटला होता -त्यावर एक चांदीची गोल टोपशी होती, त्यात उकळता चहा होता. . बाजुलाच तीन चार बिस्किट, खारी, नाणखट, शिळेस ह्यांच्या बरण्या होत्या. तर एका बाजुला एक काळ्या रंगाचा रेडीयो होता. एक चमचा धरलेला हात आला आणि चहा लागला. (हा तोच तो टपरीवाला होता) त्या टपरीवाल्याने सांशीमार्फत चहाची टोपशी उचल्ली, आणि एक काचेच ग्लास वाफाळत्या चहाने