राधा प्रेम रंगली - भाग ३

  • 5.6k
  • 3.3k

" ही राधा स्वतः ला खुप हुशार समजते काय..." समोर पेशंटशी दिलखुलास बोलत असलेल्या राधेला पाहत प्रिती स्नेहा ला बोलते.. " तु का सकाळपासुन तिच्या मागे हात धुवून लागली आहेस...करू देत ना तिला काय करायचे ते..." वैतागलेली स्नेहा प्रिती ला एक बोट दाखवत ओरडतेच जवळ जवळ...कारण मनवा ने सांगितल्यापासुन आता लंच टाईम पर्यंत राधा सर्व पेशंटची हिस्ट्री मनापासुन जाणुन घेत असते...तर मिस प्रिती , हॉस्पिटल आपल्या बापाचे असल्याप्रमाणे सकाळ पासुन नुसतीच उंडरत होती एका वॉर्ड मधुन दुसर्या वॉर्ड मध्ये... " ऐ आवाज कुणावर वाढवते गं..." तिच्या बोटात आपलं बोट अडकवुन प्रिती बोलते, " हा शहाणपणा माझ्यासमोर नाही करायचा हं... मी