सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 3

  • 5.7k
  • 2.9k

दुसर्या दिवशी सकाळी प्रतापराव बर्यापैकी सावध झाले होते.घाव भरायला अजून दहाबारा दिवस लागणार होते.दयाळांनी आठवडाभराची औषध दिली होती.त्यात लेप,चाटण व काढे होते. आपण दोन दिवसांत पून्हा फेरी मारु असं ते म्हणाले.त्यांना किनार्यावर सोडण्यासाठी शाम चांद घोडा घेऊन गेला.ते गेल्यावर जानकी आजोबांसाठी शिरा व दूध घेऊन त्यांच्या खोलीत गेली. " आजोबा, थोडं टेकून बसा मी दूध भरवते." " मी आता अगदी ठिक आहे.मी खाऊ शकतो." प्रतापराव हसत म्हणाले. प्रतापरावांनी नाष्टा केल्यावर जानकीने विचारले.... " आजोबा चंद्रसेन म्हणजेच माझ्या बाबां बद्दल कसलं गुपीत तुम्ही ह्रदयात जपून ठेवलंय? नेमकं काय घडलं होतं बाबांच्या बाबतीत? तुम्ही मध्ये -मध्ये नौका घेऊन कुठे जात असता?" प्रतापराव