मल्ल प्रेमयुध्द दोघेसुद्धा पूर्ण रस्त्याने काहीही बोलत नव्हते.वीर गाडी चालवत तिरक्या नजरेने तिच्याकडे बघत होता. "दोन महिन्यात तुम्ही माझं मन वळवणार व्हता. पण माझ्या मनासारखं झालं... तुम्हाला प्रयत्न करायची गरज न्हाय आपल्या दोघांवरच राज्य हुकल अंबानी आपला मार्ग मोकळा केला. तुम्ही माझा इचार नका करू मी खुश हाय हे लग्न मोडलं म्हणून..." क्रांती म्हंटल्यावर वीरने गाडी बाजूला घेतली आणि गाडीचा ब्रेक जोरात दाबला. " हा आता बोला काय म्हणाला? आणि हो हे माझ्या डोळ्यात बघून बोला." क्रांतीने नजर खाली केली."का आता काय झाल?" वीर"तुम्ही आबांचं ऐकावं एवढंच मला वाटतं... मी तर अजून तुमास्नी होकार पण दिला नाय...मग उगच कशाला माझ्यात