अनाथ - भाग 2

  • 5.7k
  • 1
  • 2.4k

अनाथ भाग २ राघव विदेशात पोहोचला होता. त्यानं मालमत्तेचा खटला न्यायालयात दाखल केला होता. तसं पाहता ती केस पैशानंच लढली जाणार होती. तेवढा पैसा होता त्याचेजवळ. तसा त्यानं आपला खटला न्यायालयात लढायला वकील उभा केलाच होता. फैरी फैरी झडत होत्या. राघवचा खटला सुरु झाला होता. त्यात लिहिलं होतं की ती मालमत्ता त्याचीच असून ती त्याच्या वडीलांकडून वारसानुसार त्याला मिळालेली होती. शिवाय ज्यावेळेस त्यानं किमान सतरा वर्ष पुर्ण करुन अठरा वर्षात पाऊल टाकलं. त्यावेळेस तो अठरा वर्षाचा असतांना पाहिजे त्या प्रमाणात समजदार झाला नव्हता. अशातच त्याच्या नासमझपणाचा फायदा घेवून मॅनेजरनं ती मालमत्ता आपल्या नावावर केली. जर ती मालमत्ता त्याला विकायचीच राहिली