राधा प्रेम रंगली - भाग १

  • 12.1k
  • 1
  • 6k

" प्रेम बेटा ..उठ जल्दी ...आज हमें अस्पताल जाना है...आज मुझे बहोत काम है वहा..." माँसाहेब प्रेम ला म्हणजेच आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला उठवत होत्या...विमल शर्मा ,व्यवसायाने डॉक्टर होत्या आणि घराशेजारीच गाडीने अर्ध्या तासांच्या अंतरावर असलेल्या सिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होत्या...लाडाने त्यांना सर्वचजण माँसाहेब बोलायच्या ..." हा माँ ,बस दोन मिनिटं अजुन..." प्रेम बोलतो आणि परत आपली रग घेऊन झोपतो... डिसेंबर चा महिना त्यामुळे कडक थंडीचे दिवस ... मुंबई त यावेळी खुप थंडी पडली होती..नाताळाच्या सुट्या असल्याने प्रेमला आज शाळेत न जाता माँसाहेब त्याला आपल्या बरोबर घेऊन जाणार होत्या...आणि आज दोन तीन सर्जरी असल्याने त्यांना जरा घाई होती