करामती ठमी - 2 - ठमी चा गायन क्लास

  • 6.7k
  • 3.8k

टाकाऊ पासून टिकाऊ क्लास चा बोऱ्या वाजल्यावर ठमीने आपला मोर्चा गायनाकडे वळवला. अचानक सकाळी दात घासताना तिला शोध लागला की तिचा जन्म हा गायक होण्यासाठीच झाला आहे. तोंड धुताना गुळणा करताना ती अचानक हरकती(गायनातल्या) घेऊ लागली. तिने जाहीर करून टाकलं. आईबाबा मला शास्त्रीय गायनाचा क्लास लावायचा म्हणजे लावायचा. तिचे आई बाबा म्हणाले, अगं पण असं अचानक कसं ठरलं तुझं? आधीचे उद्योग काय कमी आहेत का तुझे? ते काही नाही, आई बाबा तुम्ही मला जर गायन शिकण्याची परवानगी दिली नाही तर जग एका अभिजात गायिकेला मुकेल आणि पुढे हे जग त्यासाठी तुम्हाला दोष द्यायला कमी करणार नाही तेव्हा विचार करा आणि