सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 1

  • 9.7k
  • 4.5k

खाडीच्या मध्यावर छोटस् बेट होते. साधारण मैलभर व्यासाचे ते बेट एका मगरीच्या आकाराचे होते.प्रवासी त्या बेटाला नक्रद्विप म्हणत.या बेटामुळे खाडीचा प्रवाह दुभंगला होता. बेटाला वळसा घालून पाणी पुन्हा एकत्र येत समुद्राला मिळत होते.वर्षभर हिरव्या वनराईने शोभून दिसणारे ते बेट सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.समुद्रावरून येणारा खारा वारा वृक्षांत घुसला की सारे बेट सैरभैर होत असे.अवखळ वारा वेळूंच्या बनांतून जात असताना मंजूळ असा आवाज येत असे.अनेक वृक्ष- वेली फळ व फुलांनी बहरलेल्या असल्याने सारा परीसर गंधित व रंगीत दिसत होता.जमीनीवर गालीच्या सारखा हिरवा चारा पसरला होता.पिवळी, जांभळी, नारिंगी,निळी, पांढर्या व लाल रंगाची फुले त्या हिरव्या गालिच्याची शोभा वाढवत होती. अनेक प्रकारचे