मर्डर वेपन - प्रकरण 2

  • 6.7k
  • 4.2k

प्रकरण २ ऑफिसची वेळ संपत आली तेव्हा सौम्याने पाणिनीला विचारलं, “ बंद करायचं ऑफिस?” “आणखी काही करण्यासारखं हातात नाही आपल्या.” पाणिनी म्हणाला. “सर तुम्ही त्या मुलीचा रात्रभर विचार करत बसणार आहात का?” “तिला विसरता येत नाही. मला वाटतं आपण तिला भेटायला विलासपूर ला जाऊया” “पण ती तिथे नाहीये अत्ता.” “पण तिचा फ्लॅट तिथे आहे आणि आपल्याकडे त्या फ्लॅटची किल्ली आहे.” “तिच्या घरात आपल्याला काय सापडणारे?” “काहीतरी क्लू मिळेल किंवा कदाचित काही मिळणारही नाही.” पाणिनी म्हणाला. “सर, तुम्ही तिच्या फ्लॅटमध्ये शिरणार आहात?” “मलाच माहीत नाही. आता तरी काही सांगता येणार नाही. पूल आला की तो कसा ओलांडायचा याचा मी विचार करीन.