समुद्रातील बेट

  • 5.8k
  • 1
  • 2.5k

महाराष्ट्रात रंजनपूर नावाचं एक लाखभर वस्ती असलेलं गाव होतं, तिथे गोविंदाचार्य नावाच्या ऋषींचा आश्रम होता,गावाच्या मध्यभागी हा आश्रम वसलेला होता. त्यात गोविंदाचार्य त्यांच्या दहा शिष्यांसंवेत राहत असत. आश्रमात एक गणपतीचे मोठ्ठे मंदिर होते,तिथे दर चतुर्थीला भजन कीर्तन चालत असे. दर चतुर्थीला आचार्य स्वतः मोदक बनवून गणपतीला नैवेद्य दाखवत असत. आणि मग सगळ्या लोकांमध्ये तो प्रसाद वाटून टाकत. तेथील लोकं मोठया भक्तिभावानं गणपतीचं,संताचं दर्शन घ्यायला येत असत. रोज संध्याकाळी लोकं आचार्यांकडे संसारातील काही न काही गाऱ्हाणी घेऊन येत असत. कोणाला मूल होत नाही म्हणून तर कोणाला दर वर्षाला मूल होते म्हणून, कोणाचा नवरा दारू पिऊन मारायचा म्हणून तर कोणाचा नवरा घराकडे