मल्ल प्रेमयुध्ददादा आणि आशा दरवाजात उभे राहून वीर आणि आबांचे बोलणे ऐकत होते. वीरचे त्याच्याकडं लक्ष गेल. " नमस्कार आबासाहेब" दादा म्हणाले.आबांनी सुद्धा नमस्कार केला. आदराने स्वागत केले. सुलोचनाबाई बाहेर आल्या. आशाताई आणि सुलोचनाबाई आतमध्ये गेल्या.चहापाणी झाले . दादांनी डायरेक्ट विषयालाच हात घातला. "आबासाहेब माफ करा पण आम्ही तुमचा आणि वीररावांचे बोलन ऐकलं. चुकीच नाय तुमचं... तुम्ही तुमचं मत मांडाव आम्हाला काय वाईट वाटत नाय, तुम्हीच सांगा कारण आधीच आम्ही सांगितलं होतं तुम्हाला क्रांतीच्या आयुष्यात महत्त्वाच्या स्थानावर असलेला कुस्ती हा विषय संपणार नाय पण तुमचं मत नसेल तिला पुढे पाठवायचा तर आत्ताच आपणही लग्न मोडलेल बरं नंतर वितुष्ट नको, वाद