भाग 29भयानक ट्रक भाग 3 रघ्याने ट्रकची पायरी चढुन एक कटाक्ष ट्रकच्या आत टाकला, तसे रघ्याला पुढचे दृश्य दिसून आले, ज्याप्रकारे दुस-या ट्रकना असतात त्याच प्रकारे सर्व कण्ट्रोल होते , म्हणजेच स्टेरिंग , गियर , इत्यादी.! आत एक छोटासा बल्ब जळत होता, पण त्या छोट्या बल्बने सुद्धा आतल सर्व काही दिसुन येत होत, राम्या , ड्राइव्हरच्या बाजुला बसला होता , ड्राइव्हर आणि राम्या दोघांची शरीरयष्टी मिलती जुळती होती , त्या ड्राइव्हरने आपल्या अंगात एक काल्या रंगाची टी-शर्ट घातली होती, आणि खाली एक जीन्स पेंट. तो ट्रक ड्राइव्हर एकटक आपल्या थंड नजरेने पुढे पाहत होता , जणु त्याची नजर रसत्यावर खिळून